Home Accident News रिक्षाची बंद लाईट धडक आणि पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्‍यू, पत्‍नी– मुलगी जखमी

रिक्षाची बंद लाईट धडक आणि पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्‍यू, पत्‍नी– मुलगी जखमी

Rickshaw lights off and Accident police officer killed

नवापूर | नंदुरबार: धुळे– सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूरनजीक रायंगण गावाजवळ रात्री ॲपेरिक्षा व मोटरसायकलचा अपघात (Accident) घडला. यामध्ये मोटारसायकलस्वार पोलिस दिनकर पाडवी यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. तर पत्नी व दीड वर्षांचा मुलगा जखमी आहेत. त्‍यांच्‍यावर व्यारा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वावडी (ता. नवापूर) येथील रहिवासी दिनकर पाडवी हे सिंधुदुर्ग येथे पोलीस दलात सेवेत होते. दिनकर पाडवी हे पत्नी व मुलासह सासरवाडी तीन टेम्बा (ता. नवापूर) येथून आपल्या गावाला वावडी (ता. नवापूर) परत मोटारसायकलने (क्र. जीजे २६, जे ७८८१) जात होते. या दरम्‍यान रायंगणजवळ लाईट बंद असलेल्या ॲपेरिक्षाने (क्र. जीजे २६, यु १४५१) जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघात होताच स्थानिक लोकांनी जीवनधारा रुग्णवाहिकेच्या विनेश गावित यांना अपघाताची माहिती दिली अॅम्बुलन्‍सने जखमींना उपचारांसाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस दिनकर पाडवी यांचा मुत्य झाला. तर त्यांची पत्नी ज्योती पाडवी हे व्यारा येथे उपचार घेत आहेत. त्यांना दिड वर्षाचा मुलगा जयेश पाडवी आहे. याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Rickshaw lights off and Accident police officer killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here