Crime: अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळविले
Kopargaon Crime| कोपरगाव: तालुक्यातील वारी येथील अल्पवयीन मुलगी जातेगाव टेंभी ता.वैजापूर येथील आरोपीने बेकायदेशीररित्या पळवली (abducted) असल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी मुलीचे वडील हे वारी येथील रहिवासी असून त्यांचा शेत मजुरीचा व्यवसाय आहे. ते पत्नी, आई, वडील, व सतरा वर्षीय लहान मुलीसह दोन मोठ्या भावंडासह राहत होती. रविवार दि 17 एप्रिल रोजी दुपारी जातेगाव टेंभी येथील आरोपीने मुलीला अमिष दाखवून अज्ञात कारणासाठी पळवून नेले. आजूबाजूला शोध घेऊनही ती मिळून आली नाही. तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, फौजदार गवसने यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल (Crime) केला आहे.
Web Title: minor girl was tricked and abducted