Theft: संगमनेरात भरदिवसा घरफोडी, सव्वा चार लाखांचा मुद्देमाल लंपास
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील पुणे-नाशिक महामार्गावरील स्वदेश हॉटेलच्या पाठीमागे चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या घरफोडीत 4 लाख 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस (Theft) गेला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील स्वदेश हॉटेलमागे अनिल दिनकर काळे हे राहतात. दि. 19 मार्च रोजी घरी कुणीही नसल्याने चोरट्यांनी दोन पिक अप वाहनातून येऊन घराचे गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील 1 लाख 50 हजार रुपये रोख, 1 लाख 41 हजार रुपयांचे 47 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व कानातील झुमके, 36 हजार रुपये किमतीचे 12 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी, 90 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व अंगठी, 3 हजार रुपये किमतीची 1 ग्रॅम वजनाची सोन्याची लटकण साखळी, 2500 रुपये किमतीचे 54 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण असा एकूण 4 लाख 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
याबाबत अनिल दिनकर काळे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सचिन काशीनाथ रोकडे (रा. बालाजीनगर, संगमनेर), अशोक बडे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 200/2022 भारतीय दंड संहिता 380, 454 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. जाणे करत आहेत.
Web Title: Sangamner Theft Burglary all day property