Home महाराष्ट्र धक्कादायक: शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

धक्कादायक: शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

Aurangabad Three children drown in farm

Aurangabad | औरंगाबादः जिल्ह्यातील शरणापूर शिवार परिसरात पोहण्याकरिता गेलेल्या ३ मुलांचा पाण्यात बुडून (drown)  मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने  गावावर शोककळा पसरली आहे. आज दुपारी अग्निशमन दलाच्या जवानांनी या तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहे.  यावेळी जवळपास संपूर्ण गाव जमा झाले होते.

पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला, असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी प्राथमिक माहिती अशी की,  शरणापूर शिवारात भांगसी गड पायथ्याशी नारायण वाघमारे यांचे शेततळे आहे. या तळ्यावर सायकलवर फिरण्याकरिता ही मुले गेली होती. तळ्यावर पोहोचल्यावर ते पोहण्याकरिता पाण्यात उतरले होते. मात्र, पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

प्रतिक आनंद भिसे (वय- 15), तिरुपती मारोती इंदलकर (वय- 15) आणि शिवराज संजय पवार (वय- 17) असे या घटनेत मयत मुलांची नावे आहेत.  सकाळी शेततळ्यावर फिरण्याकरिता गेलेल्या मुलांचा या पद्धतीने दुर्दैवी अंत होईल, याची कल्पना देखील कुणी केली नव्हती. मात्र, शिवारात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेने गाव सुन्न झाले आहे.

Web Title: Aurangabad Three children drown in farm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here