Ahmednagar: महिलेने स्वतःला पेटवून घेत दुसऱ्या मजल्यावरुन मारली उडी
अहमदनगर | Ahmedagar: अहमदनगर शहरातील तारकपूर भागातून आज धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेने स्वतःला पेटवून घेत घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. आज सकाळी तारकपूर भागात ही घटना घडली. पुजा मनोहर चुग (वय ३३ रा. तारकपूर) असे जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुजा आज सकाळी घरातील दुसऱ्या मजल्यावर असताना तिने स्वतःला पेटवून घेत. काही कळायच्या आत त्यांनी ओरडत आपल्या घरावरील दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून उडी मारली. हे चित्र अनेक नागरिकांनी पाहिले.
दुसऱ्या मजल्यावरुन पडल्यामुळे पुजा यांच्या डोक्याला मार लागल्याने ती जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र पुजा यांनी पेटून का घेतले याबाबत माहिती अद्याप समोर आली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक शोध घेत आहेत.
Web Title: Ahmednagar woman set herself on fire and jumped from the second floor