Home अहमदनगर अहमदनगर: पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची या बँकेच्या अध्यक्षपदी निवड

अहमदनगर: पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची या बँकेच्या अध्यक्षपदी निवड

Ahmednagar Guardian Minister Hassan Mushrif elected chairman of the bank

Ahmednagar | अहमदनगर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आज गुरुवारी (दि. २०) रोजी पार पडली. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

तर काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उपाध्यक्षपदासाठी उत्सुकता लागून राहिली होती. अखेर याबाबतचा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, सत्तारूढ आघाडीची सकाळी ११ वाजता बैठक झाली. यामध्ये हसन मुश्रीफ आणि राजूबाबा आवळे यांची नावे निश्चित करण्यात आली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला १८, तर विरोधी आघाडीला ३ जागा मिळालेल्या आहेत.

Web Title: Ahmednagar Guardian Minister Hassan Mushrif elected chairman of the bank

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here