Home क्राईम संगमनेरात वीज कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

संगमनेरात वीज कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

Sangamner a power worker was caught red-handed taking bribe.

Ahmednagar News Live | Sangamner Bribe Case | संगमनेर: तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे सर्व्हिस मीटर लावून देण्यासाठी चक्क 2 हजाराची लाच (Bribe) घेणाऱ्या वीज वितरण कंपनीचा बाह्यस्रोत कर्मचाऱी श्रीधर परशुराम गडाख ( वय ४० वर्ष, रा. हिवरगाव पावसा) यास लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. गुरुवारी ( ३० डिसेंबर ) दुपारी २.२० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे चंदनापुरी वीज केंद्रातर्गत कार्यरत बाह्यस्रोत कर्मचारी श्रीधरने एका ग्राहकाकडे तात्पुरत्या स्वरूपात सर्व्हिस मीटर लावून देण्याच्या मोबदल्यात २ हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, सदर ग्राहकाने नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी हिवरगाव पावसा येथे सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. 

वीज ग्राहकाकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीचा बाह्यस्रोत कर्मचारी श्रीधर परशराम गडाख यास हिवरगाव पावसा येथील दर्शन किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानात रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी फिर्यादीनुसार वीज वितरण कंपनीचा बाह्यस्रोत कर्मचारी श्रीधर परशराम गडाख याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कायदा कलम ७ प्रमाणे गुन्हा (Crime) नोंदविण्यात आला. नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Sangamner a power worker was caught red-handed taking bribe.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here