पारनेर: नवोदय विद्यालयातील करोना बाधित विद्यार्थ्यांच्या आकडा वाढताच, आणखी इतकी वाढ
पारनेर | Parner Corona News Update : पारनेर तालुक्यातील नवोदय विद्यालयातील करोना बाधित विद्यार्थ्यांच्या बाधित संख्येत वाढच सुरु आहे. सोमवारी सकाळी प्राप्त अहवालात आणखी १९ विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. रविवारपर्यंत ५१ व आज १९ असे एकूण संख्या ७० वर पोहोचली आहे.
सोमवार अखेर विद्यालयातील बाधितांची संख्या ७० झाली असून अद्याप काही अहवाल शिल्लक असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी सांगितले.
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने सतर्क होत सर्व ४०२ विदयार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात आतापर्यंत ७० विदयार्थी व कर्मचारी बाधित झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. अदयापही ५० विद्यार्थ्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
नवोदय विद्यालयात मोठया संख्येने करोना बाधित विदयार्थी आढळून आल्याने प्रशासन अलर्ट झाले असून १५ दिवसांसाठी हे विद्यालय प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
Web Title: parner Corona news Update More 19 student Positive