चार वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा आरोपी 36 तासांत गजाआड
श्रीरामपूर |Rape Case| Shrirampur: श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील जळगाव गावातील अवघ्या चार वर्षीय मुलीस घरातून उचलून नेऊन तिच्यावर तुरीच्या शेतात बलात्कार केल्याची घटना घडली. या बलात्कार करणाऱ्या सिकंदर हुसेन शेख उर्फ काल्या (वय 32, रा. जळगाव, ता. राहता) याला पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या पथकाने गंगापूर (जि. औरंगाबाद) येथून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. रविवारी मध्यरात्री त्यास ताब्यात घेण्यात आले.
गुन्हा दाखल झाल्यावर काल्या हा फरार झाला होता. परंतु श्रीरामपूर तालुका पोलिसांनी मोठ्या शिथापीने तपास करून अवघ्या 36 तासांत त्याला जेरबंद केले. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुरसे यांच्यासह पोलीस हवालदार सतीश गोरे, पोलीस नाईक श्री. रन्नवरे, पोलीस नाईक श्री. वैरागर व वाहन चालक पोलीस नाईक श्री. पठाण यांचा समावेश होता.
Web Title: Accused of rape four-year-old girl disappears