Home अहमदनगर Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल

Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल

Senior social worker Anna Hazare admitted to hospital

Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अण्णा हजारे यांना छातीत दुखू लागल्याने आज सकाळी रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अण्णा यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर एन्जॉग्राफी झाली असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

रुबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अवधूत बोदमवाड यांनी अण्णा यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे. छातीत दुखू लागल्याने अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली.

Web Title: Senior social worker Anna Hazare admitted to hospital

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here