ब्रेकिंग: माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केला गळफास घेण्याचा प्रयत्न
नेवासा |Suicide | Nevasa: महावितरणच्या वतीने शेती पंपाची वीज तोडण्याची मोहीम सुरू आहे. याबाबत भाजपने काल नेवासा येथील तालुका कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. मागणी मान्य केली जात नसल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वीज वितरण कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना उडाली असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा भाजपचे पदाधिकारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. शेतकऱ्याकडून पाच हजार रुपये न घेता तीन हजार रुपये भरून घ्यावेत ही मागणी केली होती. मात्र ती मान्य न केल्याने मुरकुटे यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. भाजप पदाधिकारी यांनी त्यांना सोडवले. यावेळी कार्यकर्त्यांनी वीज बिल माफ करण्यासाठी जोरदार घोषणा दिल्या. मागण्या मान्य करा नाहीतर आत्महत्या करण्यास परवानगी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या आंदोलनात मुरकुटे चांगलेच आक्रमक होत गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला अॅप येथून अपडेट करा. संगमनेर अकोले न्यूज
Web Title: Former MLA Balasaheb Murkute tried to strangle him to Suicide