Home अहमदनगर Crime: एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग व धमकी

Crime: एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग व धमकी

Humiliation of a young woman out of one-sided love crime filed

लोणी | Crime: तु माझी झाली नाहीस तर तुला कुणाचीच होऊ देणार नाही असे म्हणत तरुणीचा विनयभंग केल्याची घटना लोणी बुद्रुक येथे तरुणी बाईकवरून घरी परतत असताना घडली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी बुद्रुक गावातील एक 29 वर्षीय तरुणी रस्त्यावरून जात असताना तेथे राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील अमोल आबासाहेब अंत्रे (वय 30) याने मोटरसायकलवरून येऊन तरुणीच्या स्कुटीला मोटारसायकल आडवी लावत तरुणीचा हात धरून तू जर माझी झाली नाहीस तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही. मी माझे किंवा तुझ्या जीवाचे काहीपण बरे वाईट करून टाकीन, अशी धमकी देत तरुणीचा विनयभंग केला.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

याप्रकरणी तरुणीने लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: Humiliation of a young woman out of one-sided love crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here