Home अहमदनगर तरुणाकडून विवाहितेवर अत्याचार, आरोपीस अटक

तरुणाकडून विवाहितेवर अत्याचार, आरोपीस अटक

तरुणाकडून विवाहितेवर अत्याचार, आरोपीस अटक

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील स्पष्ट बोलता न येणार्यास विवाहित महिलेवर अत्याचार करण्याची घटना घडली. हा प्रकार दि. 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height
या बाबतची माहिती अशी की, दि. 4 सप्टेंबर रोजी तालुक्यातील एका गावातील स्पष्ट बोलता न येणारी विवाहित महिला जनावरे चारत होती. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कमलेश बापू उगले रा. घोगरगाव ता. श्रीगोंदा याने सदर महिलेवर अत्याचार केला व हा प्रकार कुणाला सांगितलास तर ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. पीडित महिला ही बोलताना अडखळत बोलते तिला स्पष्ट बोलता येत नसल्यामुळे तिने झालेला हा प्रकार हातवारे करून एका नातेवाईक महिलेला सांगितला , त्यानंतर पीडित महिलेच्या नातेवाईक महिलेने दिलेल्या फिर्या्दिवरून श्रीगोंदा पोलिसांनी कमलेश उगले याच्या विरोधात गुन्हा दाखल करून बुधवारी उशिरा रात्री आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार करत आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here