Home Accident News संगमनेर: विजेचा शॉक बसून कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू

संगमनेर: विजेचा शॉक बसून कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू

Accident Death of a contract power worker due to electric shock

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारातील एका वीज खांबावर जम्प टाकत असताना अचानक वीजप्रवाह सुरु झाल्याने विजेचा शॉक लागून एका कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.  

श्याम रामा गायकवाड वय २१ रा. नान्नजदुमाला संगमनेर असे या मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगाराचे नाव आहे.

नान्नज दुमाला शिवारातील एका वीजखांबावर जम्प टाकण्यासाठी परमीट घेऊन कंत्राटी वीज कामगार श्याम गायकवाड हे खांबावर चढले असता जम्प टाकण्याचे काम सुरु असताना अचानक वीजप्रवाह सुरु झाल्याने विजेचा शॉक बसून श्याम गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी ग्रामस्थांनी व नातेवाईक यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली तसेच मृतदेह तोपर्यंत खाली घेण्यास विरोध केला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत मृतदेह खाली घेत पंचनामा केला.

Web Title: Accident Death of a contract power worker due to electric shock in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here