कोपरगाव तालुक्यातून दोन दिवसांत तीन मुलीचे अपहरण
कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून मंगळवारी व बुधवारी या दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील बोलकी, शहजापूर व शिरसगाव या भागातून मुलींचे अपहरण झाले आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या पालकांच्या फिर्यादी आल्या असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या अपहरण प्रकरणी कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
यामध्ये तालुक्यातील बोलकी शिवारातील १६ वर्ष ९ महिने वय असलेल्या मुलीचे मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अपहरण झाले आहेत तर दुसऱ्या घटनेत शहजापूर येथील १४ वर्ष १० महिने वयाची मुलीचे बुधवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास अपहरण झाले आहे.
तिसऱ्या घटनेत शिरसगाव येथील १६ वर्ष ६ महिने वय असलेल्या मुलीचे बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अपहरण झाले आहे. अशा एक प्रकारच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. मात्र या तीन घटनांचा एकमेकांशी संबध आहे का? याबबत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार करीत आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: girls abducted from Kopargaon taluka in two days