Nagar Taluka: नगर तालुक्यात बॉम्बस्फोट दोन जण जखमी
अहमदनगर | Nagar Taluka: नगर तालुक्यातील नारायणडोह गावात एका शेतवस्तीवर झालेल्या बॉम्ब स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील नारायणडोह येथे गावापासून दूर अंतरावर असणाऱ्या रामराव फुंदे यांच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला होता. या मुरूममध्ये पिन असणारा जुन्या काळातील बॉम्ब आढळून आला होता.
दरम्यान शेतात गवत काढण्यासाठी आलेल्या फुंदे यांच्या पत्नी मंदाबाई यांना तो बॉम्ब सापडला. त्या महिलने तो बॉम्ब गावाजवळील शेतात काम करत असलेल्या अक्षय साहेबराव मांडे या तरुणाकडे दिला. त्याने तो बॉम्ब जमिनीवर आपटला असता त्याचा मोठा स्फोट झाला. यामध्ये अक्षय व मंदाबाई फुंदे हे दोघे जखमी झाले आहे.
या घटनेची माहिती समजताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानाप यांनी पथकासह भेट दिली. बॉम्ब पथकाने त्याठिकाणी पाहणी करण्यात आली इतर ठिकाणी बॉम्ब आढळून आला नाही.
Web Title: Two injured in Nagar taluka blast