Home अहमदनगर शेळी चोरताना गोळीबार करणारा आरोपी अटकेत

शेळी चोरताना गोळीबार करणारा आरोपी अटकेत

Karjat Accused arrested for stealing goat

कर्जत | Karjat: कर्जत तालुक्यातील निंबोडी येथील शेतकऱ्यावर शेळी चोरताना गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.

बापू गणपत गरड रा. निंबोडी ता. कर्जत यांना आपल्या शेळीची चोरी होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा केला, त्यांचा भाऊ खंडू व भाचा किसन चोराला पकडण्यासाठी पाठलाग केला शेळी घेऊन जात असताना चोरट्याने गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खंडू किसन गरड व भरत दिनकर बर्डे यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना १० एप्रिलला घडली होती.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नगर उस्मानाबाद, सोलापूर व बीड बीड जिल्ह्यातील रेकॉर्डवरील शंभरपेक्षा अधिक आरोपींची माहिती घेतली. यांच्या पथकाने केलेल्या तपासात हा गुन्हा अमर दत्तू पवार रा. अरणगाव  व  करण काळे रा. पाथरुड  उस्मानाबाद यांनी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी पोलिसांना हुलकावणी देत असत. २१ एप्रिलला आरोपी पाथरुड, वडगाव नळी परिसरात फिरत होते. या परिसरात पोलिसांनी दोन दिवस थांबून २२ एप्रिलला रात्री अमर दत्तू पवार यास ताब्यात घेतले. दुसरा आरोपी करण काळे हा पळून गेला आहे.   

Web Title: Karjat Accused arrested for stealing goat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here