इंदोरीकर महाराजांनी याबाबत केली पोलिसांत तक्रार दाखल
अहमदनगर: प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी खटल्यातून दिलासा मिळाला आहे. मात्र आता इंदोरीकर महाराज यांचे वक्तव्य प्रसारित करणाऱ्या युट्युब चॅनेलच्या अडचणीत वाढ होणार आहे
पुण्यातील पोलीस ठाण्याकडून काही .युट्युब चॅनेलला नोटीस पाठविण्यात आले आहे. इंदोरीकर महाराजांनी १६ जुलै २०२० रोजी स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यावरती करोनामुळे पोलीस संथ गतीने तपास सुरु होता. पोलिसांकडून २५ ते ३० मोठ्या युट्युब चॅनेलळा नोटीस पाठविल्याची माहिती आहे.
इंदोरीकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत कोणतही अधिकृत संकेतस्थळ किंवा युट्युब चॅनेल नसल्याचे स्पष्ट केले आहे. युट्युब चॅनेलवर माझ्या परवानगीशिवाय व्हिडियो प्रसारित केले जातात. आर्थिक फायदा मिळविण्यासाठी व्हिडियो विनापरवानगी प्रसारित करणे व व्हिडियोमध्ये छेड छाड करत प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी इंदोरीकर महाराजांनी तक्रारीत केली आहे.
Web Title: Indorikar Maharaj Complaint in Police