Home अकोले अकोले तालुक्यात या गावांत करोना बाधितांची वाढ

अकोले तालुक्यात या गावांत करोना बाधितांची वाढ

Akole Taluka Corona Update Today 10 Positive  

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात १० जण करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३३४४ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात देवठाण येथील ६५ वर्षीय पुरुष, अंभोळ येथे ४४ वर्षीय पुरुष,११ वर्षीय मुलगा, ३२ वर्षीय महिला, भुजबळ वस्ती रेडे येथे ५० वर्षीय पुरुष, हिवरगाव येथे ५३ वर्षीय महिला, बेलापूर येथे ५३ वर्षीय पुरुष, केळी रुम्हनवाडी येथे १७ वर्षीय मुलगी, अकोले येथे २७ वर्षीय पुरुष, लव्हाळी येथे २५ वर्षीय पुरुष असे १० जण बाधित आढळून आले आहेत.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात आज ३२७ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. अकोले तालुक्यातील ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज जिल्ह्यात ५०९ रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या २०१५ इतकी झाली आहे.

Web Title: Akole Taluka Corona Update Today 10 Positive  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here