Home अहमदनगर Rahuri: राहुरीत एका महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

Rahuri: राहुरीत एका महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

Rape of a woman in Rahuri

राहुरी | Rahuri: राहुरी कारखाना येथील प्रसादनगर परिसरात मंगळवारी साडे आठ वाजण्याच्या सुमारास आरोपीने घरात घुसून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना घडली आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे.  याप्रकरणी आकाश बोरुडे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या घरात मंगळवारी  साडे आठ वाजेच्या सुमारास अनधिकाराने घुसून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने तसेच तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देण्यात आली. याबाबत पिडीत महिलेने राहुरी पोलिसांत फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून आकाश बोरुडे याच्याविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास सहायक फौजदार गायकवाड हे करीत आहे. नगर जिल्ह्यात महिलेवरील अत्याचाराचे गुन्हे हे अधिक प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे.  

Web Title: Rape of a woman in Rahuri

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here