अहमदनगर: सायकल खेळताना हॅन्डलचा नट घशात अडकल्याने ९ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Ahmednagar, Rahuri: सायकल खेळताना खाली पडून हॅन्डलचा नट घशात अडकल्याने तिसरी इयत्तेत शिकणार्या 9 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू (Died) झाल्याची घटना.
राहुरी: सायकल खेळताना खाली पडून हॅन्डलचा नट घशात अडकल्याने तिसरी इयत्तेत शिकणार्या 9 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहुरी तालुक्यातील त्रंबकपूर येथे ही घटना घडली. राधा बाबासाहेब कोळसे असे या मुलीचे नाव आहे.
राधा ही गुहा येथील तनपुरे कारखान्याचे माजी संचालक कै. बाबुराव रंगनाथ पा. कोळसे यांची पणती आहे. रविवारची सुट्टी असल्याने राधा सायकल खेळण्यासाठी रोडवर गेली होती. परत घराकडे फिरण्यासाठी सायकल वळवित असताना तोल जाऊन ती खाली पडली. यावेळी सायकलच्या हॅन्डलचा नट तिच्या घशात अडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गुहा, त्रंबकपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Earn Money online | फेसबुक वरून कसे पैसे कमवितात | How to earn money from facebook in Marathi
जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation. भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC. सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.
Web Title: 9-year-old boy died after a handle nut stuck in his throat while playing a bicycle
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App