अश्लील व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलांकडून 5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
Breaking News | Satara Crime: एका गावात 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार.
सातारा | शिरवळ : शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आला. हे घृणास्पद कृत्य अल्पवयीन मुलांनीच केल्याचे उघड झाले आहे. मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ पाहून दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलिस ठाणे हद्दीत एका गावात ही धक्कादायक घटना घडली. ही घटना सोमवारी (दि.१६) उघडकीस आली. या घटनेची माहिती समजताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. मात्र, यावेळी आरोपीने पलायन केले होते. पोलिसांनी तपासाची चक्री वेगाने फिरवून संबंधित दोन्ही नराधम आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दोन्ही कुटुंब बाहेर गावचे असून, शिरवळ परिसरातील एका गावात भाडोत्री म्हणून राहत आहेत. पीडित बालिका आणि नराधम मुलाने हे शेजारी राहत आहेत. 5 वर्षीय मुलगी संबंधित मुलांकडे खेळायला जात असे. रविवारी (दि.१५) रोजी पीडित व आरोपी हे एकत्र खेळत असताना पीडितेला आरोपीने घराच्या टेरेसवर नेत मोबाईलमधील अश्लील क्लिप पाहत अत्याचार केला.
दरम्यान, या प्रकाराची माहिती पीडित मुलीने आपल्या आईला सांगितली. याबाबत शिरवळ पोलिसांना माहिती मिळाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या घटनेची माहिती घेतली व आपली तपासचक्र फिरवत आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक नयना कामठे करत आहेत.
Web Title: 5-year-old girl molested by minors after watching pornographic videos
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study