Home अहिल्यानगर अहिल्यानगर:  सर्पदंशाने 40 वर्षीय प्राणीमित्राचा करुण अंत, उपचारादरम्यान घेतला शेवटचा श्वास

अहिल्यानगर:  सर्पदंशाने 40 वर्षीय प्राणीमित्राचा करुण अंत, उपचारादरम्यान घेतला शेवटचा श्वास

Breaking News | Ahilyanagar: अनुभवाच्या आधारे सापाला सुरक्षितरीत्या पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र, दुर्दैवाने त्या सापाने अचानक त्यांना चावा घेतला.

40-year-old animal lover dies tragically from snakebite

अहिल्यानगर:  सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये अनेक घटना पहायला मिळत असतात. कधी हास्यास्पद तर कधी गंभीर तर कधी हळव्या करणाऱ्या. असात एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. जो अहिल्यानगर शहरामधला आहे. हा व्हिडिओ नगरमध्ये प्रसिद्ध असलेल्या प्राणीमित्राचा आहे. नगर शहरातील सावेडी क्षेत्रात एक दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे, ज्यात प्राणीमित्र समीर इंगळे, जो की फक्त 40 वर्षांचा होता, त्यांचा मृत्यू झाला आहे.

साप पकडण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या हाताला साप चावला, यामुळे हा थरारक क्षण घडला. या घटनेचा व्हिडिओ आता सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे नगर शहरातल्या सर्व नागरिकांना एक धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावेडी भागात साप आढळल्याची गंभीर माहिती समजताच तात्काळ समीर इंगळे यांनी त्या ठिकाणी पोहोचण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणेच त्यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे सापाला सुरक्षितरीत्या पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र, दुर्दैवाने त्या सापाने अचानक त्यांना चावा घेतला. तत्काळ परिस्थितीची गांभीर्याने विचार करून, त्यांना शहरातील एक खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Breaking News: 40-year-old animal lover dies tragically from snakebite

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here