Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात ४ ते ५ दिवस विजांच्या कडकडाटासह बरसणार पाउस- Rain

अहमदनगर जिल्ह्यात ४ ते ५ दिवस विजांच्या कडकडाटासह बरसणार पाउस- Rain

Ahmednagar Rain Alert:  अहमदनगर जिल्ह्यात चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाउस पडणार, सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे.

4 to 5 days of rain with lightning

अहमदनगर: जिल्ह्यात चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाउस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस विजांच्या कडकडटासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर याबाबत माहिती  दिली आहे.

बंगालच्या उपसागरात जो प्रभाव तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात दुपारनंतर पाऊस पडत आहे. सध्या होत असलेला पाऊस हा परतीचा पाऊस नाही. तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या स्थितीमुळे हा पाऊस पडत असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

पुढील चार-पाच दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यात दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जुन ते सप्टेंबर दरम्यान राज्यात एकूण 123 टक्के पाऊस पडला आहे. तर देशातील पावसाचं प्रमाण 106 टक्के आहे.

पुण्यात सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात झालेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. अनेक भागात वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली. मागील काही दिवसांपासून पुण्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची मोठी धांदल उडाली आहे.

Web Title: 4 to 5 days of rain with lightning

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here