Home Accident News ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात ३ युवक ठार, बोलेरोचा चक्काचूर

ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात ३ युवक ठार, बोलेरोचा चक्काचूर

Breaking News | Kolhapur Accident:  महामार्गावर बोलेरोची ट्रकला धडक बसून भीषण अपघात, एकाच गावातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू.

3 youths killed in truck-bolero accident, bolero crushed

कोल्हापूर: देवगड-निपाणी राज्य महामार्गावर बोलेरोची ट्रकला धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच गावातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. ऐन गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे.

भीषण अपघातात सोळांकुर गावातील शुभम चंद्रकांत धावरे (२८), आकाश आनंदा परीट (२३) आणि रोहन संभाजी लोहार (२४) या तीन युवकांचा मृत्यू झाला. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, ११ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १२:३० वाजता सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ वळणावर ट्रक ने बोलेरोला समोरून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरोचा चक्काचूर झाला आहे.

सोळंकूर गावातले ६ जण कामासाठी गारगोटीला गेले होते. काम आटोपून ते रात्री उशीरा घरी येताना मुदाळ तिठ्ठ्यावर संभाजी लोहार हे त्यांच्या गाडीत बसले. तिथून पुढे आल्यावर रस्त्यातच हा भीषण अपघात झाला. अपघातानंतरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. अपघाता बोलेरो चालक शुभम धावरे याचे शीर धडावेगळे झाले होते

दरम्यान, या अपघातानंतर फिर्यादी राजेंद्र मनोहर लोहार (वय ४१, रा. सोळांकुर) यांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. अपघाताची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. अज्ञात ट्रक चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून अपघात केल्यानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: 3 youths killed in truck-bolero accident, bolero crushed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here