Home पुणे शिक्षकाकडून १९ विद्यार्थिनींचा विनयभंग

शिक्षकाकडून १९ विद्यार्थिनींचा विनयभंग

Breaking News | Pune Crime: शिक्षकानेच शाळेच्या शाळेतील तब्बल १९ विद्यार्थिनींचा विनयभंग , आरोपी शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

19 female students molested by the teacher

पिरंगुट | पुणे: मुळशी तालुक्यामध्ये बदलापूरसारखा धक्कादायक येथील जिल्हा विद्या विकास मंडळ संस्थेच्या शाळेमध्ये जालिंदर नामदेव कांबळे हा विद्यार्थिनींना मारहाण करून त्यांच्याशी अश्लील प्रकार उघडकीस भाषेत बोलतो व शारीरिक आला असून, लगट करण्याचा प्रयत्न करतो, अशी एका नराधम तक्रार शिक्षकानेच शाळेच्या शाळेतील तब्बल १९ विद्यार्थिनींचा विनयभंग केला.

५४ वर्षीय शिक्षक जालिंदर नामदेव कांबळे (रा. लोणीकाळभोर, पुणे) याला अटक करण्यात आली. मुळशी तालुक्यातील आंदगाव एका मुलीने व्यवस्थापनाकडे केली होती. त्यानुसार सप्टेंबर रोजी संस्थेच्या कार्यकारिणी समितीने याची चौकशी केली तेव्हा तब्बल १९ विद्यार्थिनींनी लेखी तक्रारी केल्या होत्या.

शाळेकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, कांबळेने शाळेत खेळणाऱ्या मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला मिठी मारली त्या वेळी इतर विद्यार्थी ओरडल्याने त्याने तिला सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. कांबळे हा वर्गामध्ये विनाकारण विद्यार्थिनींच्या अत्यंत जवळ जाऊन कानामध्ये बोलायचा किंवा मग मोठ्याने कानात ओरडायचा. हाताला स्पर्श करून डोक्यावर डोके आपटत होता, त्याला विरोध केल्यानंतर तो मुलींना मारहाण देखील करायचा.

त्याचबरोबर शिक्षक कांबळे हा शिकवताना विनाकारण फळ्यावर मुका, किस, पप्पी असे शब्द मुद्दाम लिहायचा. शिकवताना मामाने मामीला मळ्यात मिठी मारली, असं देखील म्हणायचा. शाळेतील विद्यार्थिनींनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. मिळालेल्या तक्रारीच्या आधारे जालिंदर कांबळेला पौड पोलिसांनी लोणी काळभोरमधून अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव हे करीत आहेत.

Web Title: 19 female students molested by the teacher

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here