Home क्राईम प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या 17 वर्षीय तरूणीवर RPF जवानाकडून बलात्कार

प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या 17 वर्षीय तरूणीवर RPF जवानाकडून बलात्कार

Pune Crime: अल्पवयीन मुलीसोबत सलग पाच दिवस अत्याचार (Raped).

17-year-old girl who ran away with her boyfriend to Pune was raped by an RPF jawan

पुणे: अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने (आरपीएफ)  एका 17 वर्षीय मुलीला पाच दिवस डांबून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात आलेल्या 17  वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने बलात्कार केला आहे.  याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. महिलेंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे.

याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली आहे. आरपीएफ जवान अनिल पवार आणि सिध्दार्थ मल्टिपर्पज सोसायटी संस्थेचा कर्मचारी कमलेश तिवारी अशी आरोपींची नावे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुण ही दहावीत शिकायला असून छत्तीसगड राज्यात कुटुंबासह वास्तव्यास आहे. लीलाधर ठाकूर नावाचा मित्राने तिला भेटून ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम असून आपण पुण्याला जाऊन लग्न करू’ अशी बतावणी केली. 12 सप्टेंबर रोजी ते पुणे रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यावेळी तीन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. तेथून त्यांना पोलिसांकडे नेले. तेथे पोलीस गणवेशात अनिल पवार हा कर्मचारी होता. पोलीस कर्मचारी अनिल पवार याने पीडित मुलगी व ठाकूर यांना बराच वेळ बसवून ठेवले.

त्यानंतर आरोपी अनिल पवारने रेल्वे कॉलनीतील एका खोलीत पीडित मुलीला आणि ठाकूर यास बंद करून टाकले आणि पैशांची मागणी केली. त्यानंतर तिला वेगळ्या खोलीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी कमलेश तिवारी याने त्या मुलीला काम करण्याच्या बहण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ठाकूरला या दोघांनी सोडून दिले. मात्र पवार आणि तिवारी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा तिच्यावर बलात्कार करत होते.

पीडित तरुणीच्या वडील छत्तीसगड पोलिसांसह पुण्यात आले आणि मुलीची सुटका केली. तिला परत घेऊन गेल्यावर तिने छत्तीसगड पोलिसांना  आपल्यावर घडलेली घटना सांगितली.

Web Title: 17-year-old girl who ran away with her boyfriend to Pune was raped by an RPF jawan

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here