Home नागपूर बारावीची विद्यार्थिनी पडली रिक्षाचालकाच्या प्रेमात, मग असे झाले की…..

बारावीची विद्यार्थिनी पडली रिक्षाचालकाच्या प्रेमात, मग असे झाले की…..

Breaking News | Nagpur Crime: इयत्ता बाराव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी चक्क आपल्याच घरी भाड्याने राहणाऱ्या ३५ वर्षीय विवाहित रिक्षाचालकाच्या प्रेमात वेडी.

12th grade student fell in love with a rickshaw driver, then this happened

नागपूर : प्रेम आंधळे असते असे म्हणतात. त्यामुळेच प्रेमात बुडालेल्या व्यक्तींना वय आणि समाजाने घालून दिलेल्या नैतिक बंधकांनेही भान रहात नाही. असाच काहीसा प्रकार मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या उपराजधानीत उघडकीस आला. इयत्ता बाराव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी चक्क आपल्याच घरी भाड्याने राहणाऱ्या ३५ वर्षीय विवाहित रिक्षाचालकाच्या प्रेमात वेडी झाली.

भाड्याने राहणारा रिक्षाचालक विवाहित असल्याचे माहित असूनही ती त्याच्या प्रेमात कुटुंबाशी विद्रोह करण्यासही तयार होती. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी समजूत काढत तिला वस्तूस्थितीची जाणीव करून दिली आणि मुलीने संघर्ष मागे घेतला.

विशेष म्हणजे कुटुबियांना कसलीही कुणकुण न लागू देता दोघांचेही प्रेमसंबंध सुरु झाले होते. मात्र, ही बाब मुलीच्या आई मार्फत रिक्षाचालकाच्या पत्नीला कळली. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी मुलगी अल्पवयीन असल्याने रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

शांतीनगर पोलीस हद्दीत हद्दीत ही मुलगी आईवडिलांसह एका वस्तीत राहते. रिक्षाचालक नकुल तिच्या घरी भाड्याने खोली करून रहात आहे. लग्न झालेले असल्याने तो पत्नीसह येथे राहत होता. दरम्यान त्याची नजर घरमालकाच्या मुलीवर पडली. ही मुलगी बारावीच्या वर्गात शिकते.

तिला कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने नकूल तिला घेऊन अनेकदा एकाच वेळी घरातून निघत होता. तसेच घरी कुणी नसताना हे दोघे एकमेकांना वेळ देऊ लागले. त्यामुळे दोघंची चांगली गट्टी जमली. त्याने तिचा मुलीचा भ्रमणदूरध्वनी क्रमांकही मिळवत तिच्याशी चॅटिंग सुरु केले. विवाहित असलेल्या रिक्षाचालकाने मुलीला पुरते प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पत्नीच्या चोरून हे दोघे नुसते बोलत नव्हते तर एकमेकांना भेटतही होते. घरात कुणी नसताना ते दोघे एकांतात वेळही घालवत होते.

आई दोन दिवसांपूर्वी घराबाहेर गेल्याचे बघून मुलीने नकुलला घरीच भेटायला बोलावल. ज्यावेळी पत्नी घरी नसायची त्यावेळी नकूलही तिला घरात बोलवत होता. त्यामुळे संधी साधून दोघेही एकमेकांची भेटत होते. दोन दिवसांपूर्वी असाच नकूल घरी आलेला असताना आई अचानक घरी आली. तिला सगळा प्रकार दिसला. तिने बदनामी होऊ नये म्हणून नकुलला मुलीचा नाद सोडण्याची तंबी दिली.

मात्र दोघेही एकत नसल्याने आईने नकुलच्या पत्नीला या प्रकाराबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलीची समजूत घालण्यात आली. मात्र, दोघेही ऐकायला तयार नव्हते. शेवटी मुलीच्या आईने शांतीनगर पोलीस ठाणे गाठले. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत रिक्षाचालक नकूलला अटक केली.

Breaking News: 12th grade student fell in love with a rickshaw driver, then this happened

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here