शेजाऱ्यानेच घात केला! 10 वर्षांच्या मुलीला उचलून लॉजवर नेलं अन् लैंगिक अत्याचार
Breaking News |Pune Crime: अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं आणि नंतर तिच्यावरती लैंगिक अत्याचार.
पुणे: पुण्यातील वारजे परिसरातून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यात चिमुरडीचा शेजाऱ्याकडूनच घात करण्यात आला. माझ्याशी लग्न कर नाहीतर मारुन टाकेन असं म्हणत शेजाऱ्याकडून 10 वर्षीय मुलीला लग्न करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं आणि नंतर तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील वारजे परिसरातील ही घटना आहे. 10 वर्षाच्या मुलीचे दुचाकीवर अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उत्तमनगर येथील एका लॉजवर त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या दोघांसह लॉजच्या मालकासह तेथील मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गौतम, अविनाश अशोक डोमपल्ले, पिकॉक लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉजचा मॅनेजर टिकाराम चपाघई अशी आरोपींची नावं आहेत.
पुण्यातील वारजे परिसरात 10 वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाची मागणी करुन 10 वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर लॉजवर लैंगिक अत्याचार केला आहे. 21 मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाजता ही घटना घडली आहे. मुलगी रस्त्यावरून दुकानात जात होती. या वेळी आरोपी राहुल गौतम आणि त्याचा साथीदार मित्र अविनाश डोमपल्ले या दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण केले. त्यानंतर ते तिला उत्तमनगर येथील पिकॉक लॉजवर घेऊन गेले. तेथे राहुल गौतम याने तिला तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेने संताप व्यक्त होत आहे.
Web Title: 10-year-old girl picked up, taken to lodge and sexually assaulted